भिवंडी मनपाची वसुलीसाठी लिलाव प्रक्रिया सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडी मनपाची वसुलीसाठी लिलाव प्रक्रिया सुरू
भिवंडी मनपाची वसुलीसाठी लिलाव प्रक्रिया सुरू

भिवंडी मनपाची वसुलीसाठी लिलाव प्रक्रिया सुरू

sakal_logo
By

भिवंडी ता. १७ (बातमीदार) : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कराची थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे. वेळोवेळी अभय योजनेच्या माध्यमातून व्याज रक्कमेतून सूट दिल्यानंतरही मालमत्ता कराची वसुली नगण्य होत आहे. अखेर मालमता कर थकीत असलेल्या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया भिवंडी महानगरपालिका प्रशासनाने प्रभाग समिती निहाय सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये कर मूल्यांकन व करनिर्धारण विभागप्रमुख सुधीर गुरव, सहायक आयुक्त बाळाराम जाधव, कार्यालयीन अधीक्षक संजय पुण्यार्थी, मकसूम शेख, कर निरीक्षक रवींद्र वारघडे, महेश लहांगे व भूभाग लिपिक उपस्थित होते. विशेष म्हणजे ज्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे त्या ठिकाणी पालिका पथक तैनात करून ही कारवाई सुरू करण्यात आल्याने थकीत मालमत्ता करधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या काही वर्षांपासून पालिकेच्या वसुलीत मोठी तफावत आढळून वसुली कमी झाल्याने भिवंडी मनपाचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसळा यांनी हे कठोर पाऊल उचलले आहे.

....................................
प्रभाग आणि लिलाव रक्कम
पालिका क्षेत्रातील प्रभाग समिती क्रमांक एकमधील ११ मालमत्तांच्या ८८ लाख २४ हजार ३९३ व प्रभाग समिती क्रमांक चारमधील १० मालमत्तांच्या थकीत ६५ लाख ४६ हजार ७६९ असे एकूण २१ मालमत्तांच्या एक कोटी ५३ लाख ७१ हजार १६२ रुपये मालमत्ता कर वसुलीसाठी कर उपायुक्त दीपक झिंजाड यांच्या नेतृत्वाखाली लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे.