कामगारांसाठी आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगारांसाठी आरोग्य शिबिर
कामगारांसाठी आरोग्य शिबिर

कामगारांसाठी आरोग्य शिबिर

sakal_logo
By

गोरेगाव, ता. १७ (बातमीदार) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र गोरेगाव यांच्या वतीने वसई येथे बुधवारी (ता. १६) कामगारांकरिता आरोग्य तापसाणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी १६८ कामगारांनी त्‍याचा लाभ घेतला. आयडियल क्यूअर्स (औषधं) कंपनीचे मॅनेजर अभिजित बलकवडे आणि स्वीटी गुप्ता उपस्थित होत्या. या वेळी कामगार कल्याण मंडळाची योजना व उपक्रम यांची माहिती केंद्र संचालक नीलेश पाटील यांनी दिली.