शीव स्थानकाजवळील भुयारी मार्गात काळोख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शीव स्थानकाजवळील भुयारी मार्गात काळोख
शीव स्थानकाजवळील भुयारी मार्गात काळोख

शीव स्थानकाजवळील भुयारी मार्गात काळोख

sakal_logo
By

धारावी, ता. १७ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या शीव रेल्‍वेस्थानकाकडे धारावीकडून जाण्यासाठी स्थानकातील फलाट क्रमांक १ जवळ भुयारी मार्ग बनवण्यात आला आहे. या भुयारी मार्गात सध्या काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे प्रवाशांना नाहक काळोखातून मार्ग काढत बाहेर पडावे लागत असल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.
धारावीतून शीव रेल्‍वेस्थानकाकडे जाण्यासाठी काही वर्षांपूर्वी स्थानकासमोरील वाहतूक पूल ओलांडून प्रवाशांना जावे लागत होते. यामुळे अनेकदा अपघात होत होते. यावर तोडगा काढला जावा यासाठी धारावीतील रहिवाशांनी पाठपुरावा केला होता. त्याला यश येऊन रेल्वे प्रशासन व पालिकेने प्रवाशांच्या सोयीसाठी वाहतूक पुलाखालून भुयारी मार्ग बनवला होता. याचा फायदा धारावीतील प्रवाशांना होत असून स्थानकासमोरील रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी झाले आहेत.
सध्या संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अंधार पडत आहे. यामुळे भुयारी मार्गात काळोखाचे साम्राज्य पसरत आहे. या काळोखातून जाताना प्रवाशांना मोबाईल टॉर्चचा वापर करावा लागत आहे. भुयारी मार्गातील वाट नादुरुस्त झाली आहे. तसेच फेरीवाल्यांनी ठाण मांडून ठेवल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. अंधाराचा फायदा घेत महिला-मुलींची छेड काढण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, अपंग व्यक्तींना दुसऱ्याच्या आधाराने मार्गस्थ व्हावे लागत आहे. रेल्वे व पालिका प्रशासनाने यातून मार्ग काढावा, अशी मागणी प्रवासी करत आहेत.