राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी प्रणय कमले प्रशिक्षक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी प्रणय कमले प्रशिक्षक
राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी प्रणय कमले प्रशिक्षक

राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी प्रणय कमले प्रशिक्षक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : शहरातील मावळी मंडळ ही शालेय क्रीडा स्पर्धांसाठी अग्रमानांकित संस्था असून या संस्थेतील क्रीडा प्रशिक्षक प्रणय कमले यांची अलिबाग येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुमार व मुली गटाच्या स्पर्धेकरिता श्री मावळी मंडळचे खो-खो संघाचे ठाणे जिल्हा कुमार गटाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
प्रणय कमले हे मावळी मंडळ संस्थेच्या क्रीडा प्रशिक्षकपदी कार्यरत असून ते कबड्डी, खो-खो, अ‍ॅथलेटिक्स आदी विविध खेळांसाठी छोट्यांपासून कुमारवयीन गटातील मुलांना प्रशिक्षण देतात. त्यांच्या प्रशिक्षण काळात संस्थेने अनेक राष्ट्रीय, राज्य व आंतरशालेय स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. त्यांना मावळी मंडळ संस्थेतील क्रीडा प्रशिक्षक मिलिंद यादव, मिलिंद कदम, दर्शन देवरुखकर, प्रथमेश तांडेल, नाईक व बाबू मार्गदर्शन करत आहेत. संस्थेचे विश्वस्त कृष्णा डोंगरे, सुधाकर मोरे, प्रभाकर सुर्वे व संस्थेचे कार्यकर्ते यावर जातीने लक्ष घालत असतात. प्रणय कमले यांच्या निवडीबद्दल श्री मावळी मंडळ शिक्षण संस्था व ठाणेकरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.