मुंब्रा बायपासवर ट्रेलर पलटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंब्रा बायपासवर ट्रेलर पलटी
मुंब्रा बायपासवर ट्रेलर पलटी

मुंब्रा बायपासवर ट्रेलर पलटी

sakal_logo
By

कळवा, ता. १७ (बातमीदार) : मुंब्रा बायपासवर गुरुवारी सकाळी एक ट्रेलर पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात ट्रेलरचा चालक थोडक्यात बचावला आहे. गुरुवारी सकाळी मुंब्रा बायपास रस्त्यावरून भला मोठा ट्रेलर न्हावा-शेवावरून भरधाव वेगाने भिवंडी येथे जात असताना त्‍याचे ब्रेक फेल झाले. हा ट्रेलर भरधाव वेगाने जात असताना ट्रेलरच्या चालकाने या ट्रेलरच्या वेगावर नियंत्रण मिळवून तो रस्त्याच्या कडेला उतरवल्याने त्याचा वेग कमी झाला व तो पलटी झाला. या अपघातात ट्रेलरचा चालक चंद्रगुप्त कानिजिया थोडक्यात बचावला असून, किरकोळ जखमी झाला आहे. यासंदर्भात मुंब्रा पोलिस अधिक माहिती घेत आहेत.