एटीएमचा पासवर्ड मिळवून ४० हजारांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एटीएमचा पासवर्ड मिळवून ४० हजारांची चोरी
एटीएमचा पासवर्ड मिळवून ४० हजारांची चोरी

एटीएमचा पासवर्ड मिळवून ४० हजारांची चोरी

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १७ (बातमीदार) : एटीएमचा पासवर्ड मिळवून दोघा चोरट्यांनी ४० हजार रुपये चोरल्याची घटना कल्याण पूर्व येथील तिसगाव येथे घडली. कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरात राहणारे भास्कर पाटील हे नांदिवली येथील एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी गेले होते. पैसे काढत असताना त्या एटीएम मशीनजवळ दोन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यातील एकाने भास्कर पाटील यांना बोलण्यात गुंतवले; तर दुसऱ्याने त्यांच्या एटीएमचा पासवर्ड पाहिला. त्यानंतर दोघा चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून ४० हजार ४५० रुपये काढून नेले. याप्रकरणी भास्कर पाटील यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.