स्वच्छता मित्रांचा ‘स्तंभ’तर्फे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छता मित्रांचा ‘स्तंभ’तर्फे सत्कार
स्वच्छता मित्रांचा ‘स्तंभ’तर्फे सत्कार

स्वच्छता मित्रांचा ‘स्तंभ’तर्फे सत्कार

sakal_logo
By

भाईंदर, ता. १७ (बातमीदार) : दुर्गम जंगलात राहणाऱ्‍या आदिवासी वनवासींना नियमितपणे धान्य आणि जीवनावश्यक वस्तू पुरवणाऱ्‍या गोविंद जालुका यांच्या अध्यक्षतेखालील स्तंभ फाऊंडेशनतर्फे भाईंदर पश्चिम येथील माधव सेवा केंद्रात शहरातील सफाई मित्रांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मिरा-भाईंदर येथील सफाई कर्मचाऱ्यांना संबोधित करताना प्रमुख पाहुणे डॉ. नरपत सिंग म्हणाले, की स्वच्छता ही कोणा एका व्यक्तीची जबाबदारी नसून ती सामूहिक जबाबदारी आहे. या वेळी संघकार्यवाह कुमार पुजारी म्हणाले, की समाजातील विषमता दूर करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागतील, कारण जिथे स्वच्छता असते तिथे शुद्धता येते. या वेळी माजी नगरसेवक अजित पाटील, मंजुषा म्हात्रे, मनपा स्वच्छता निरीक्षक नितीन बरनवाल, अरविंद चाळके यांच्यासह किशोर थिटे, विवेक गोखले आदी उपस्थित होते.