प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडून ३५ विद्यार्थी दत्तक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडून ३५ विद्यार्थी दत्तक
प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडून ३५ विद्यार्थी दत्तक

प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडून ३५ विद्यार्थी दत्तक

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १७ (बातमीदार) : डोंबिवली पश्चिम येथील रेल चाईल्ड संस्था संचालित महात्मा गांधी विद्या मंदिर शाळेतील शैक्षणिकदृष्ट्या ३५ गरजू विद्यार्थ्यांना मनसेचे डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे यांनी दत्तक घेतले. या विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचा शालेय खर्च म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश प्रल्हाद म्हात्रे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक सुरेश बोरसे यांच्याकडे सुपूर्द केला. मागील वर्षीही प्रल्हाद म्हात्रे यांनी ७४ विद्यार्थ्यांना दत्तक घेत त्यांच्या एक लाख बारा हजार रकमेचा धनादेश शाळेकडे सुपूर्द केला होता. या शाळेतील डॉक्टर हेगडेवार सभागृहाचे उद्‌घाटन रविवारी सार्वजनिक व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. या सभागृहाच्या नूतनीकरणासाठी माजी विद्यार्थी विश्वास भोईर, प्रल्हाद म्हात्रे व शैलेश मळेकर यांनी मोलाची मदत केली. या सोहळ्यादरम्यान शाळा समितीचे अध्यक्ष गिरीश जोशी, रेड चाईल्डचे अध्यक्ष गिरीश दिघे, कार्यवाहक भगवान सुरवाडे, कोषाध्यक्ष उल्हास झोपे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.