कांजूरमार्ग येथे सापडला कुजलेला मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांजूरमार्ग येथे सापडला कुजलेला मृतदेह
कांजूरमार्ग येथे सापडला कुजलेला मृतदेह

कांजूरमार्ग येथे सापडला कुजलेला मृतदेह

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १७ (बातमीदार) ः कांजूरमार्ग पूर्वेकडील हायवेलगतच्या सर्व्हिस रोडच्या बाजूला कुजलेला मृतदेह सापडला आहे. तो पुरुषाचा असून येथील गवताळ भागात सांगाडा स्वरूपात पोलिसांना आढळला असल्याचे सांगण्यात आले. कांजूरमार्ग पोलिसांना १५ नोव्हेंबर रोजी पूर्व प्रादेशिक विभागातील नियंत्रण कक्षातून एक संदेश आला होता. त्यात या ठिकाणच्या जॉली ब्रदर्सच्या लेंडमध्ये एका नाल्याजवळ कुजलेला सांगाडा असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार कांजूरमार्ग पोलिस ठाण्यातील अधिकारी सकपाळ आणि ठाणे अंमलदार महिला उपनिरीक्षक शिंदे यांचे पथक येथे गेले असता त्‍यांना हा सांगाडा कपड्यात आढळून आला. हा मृतदेह जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिस या मृतदेहाची ओळख पटवत आहेत. याप्रकरणी कांजूरमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक इक्बाल अवळकर हे पुढील तपास करत आहेत.