‘वैजनाथ’ गैरव्यवहाराबाबत सोमय्या तहसील कार्यालयात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘वैजनाथ’ गैरव्यवहाराबाबत सोमय्या तहसील कार्यालयात
‘वैजनाथ’ गैरव्यवहाराबाबत सोमय्या तहसील कार्यालयात

‘वैजनाथ’ गैरव्यवहाराबाबत सोमय्या तहसील कार्यालयात

sakal_logo
By

कर्जत, ता. १७ (बातमीदार) ः कर्जत तालुक्यातील वैजनाथ देवस्थानच्या जमिनीची धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय विक्री केल्याप्रकरणी माहिती घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या गुरुवारी (ता. १७) कर्जत तहसीलदार कार्यालयात आले होते. त्यांनी तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांच्याशी या विषयावर चर्चा केली.
किरीट सोमय्या हे एका विवाहाला उपस्थित राहण्यासाठी कर्जतला आले होते. त्यानंतर त्यांनी भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, उप नगराध्यक्ष अशोक ओसवाल, किसान सेलचे सुनील गोगटे, जिल्हा चिटणीस दीपक बेहेरे आदींच्या समवेत तहसील कार्यालयात येऊन तहसीलदारांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी सोमय्या यांनी वैजनाथ देवस्थानच्या जमिनीची विक्री धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय अनेक वेळा झाली आहे. ठाकरे सरकारच्या काळात हे गैरव्यवहाराचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांनी ती जमीन घेतल्याचे निदर्शनात आले असल्याचे सांगितले. अचानक त्या व्यवहारात सलीम बिलाखिया याचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे या जमीन व्यवहार प्रकरणाबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना भेटणार असल्याचेही सांगितले.