ठाण्यातील बंगल्याला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यातील बंगल्याला आग
ठाण्यातील बंगल्याला आग

ठाण्यातील बंगल्याला आग

sakal_logo
By

ठाणे, ता. १७ : येथील राम मारुती रोडशेजारील धवल छाया नावाच्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर गुरुवारी दुपारी आग लागली. बंगल्यात अडकलेल्या मालक वीरधवल घाग (वय ६८) यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. तसेच आग नियंत्रणात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी नौपाडा पोलिस, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी व अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान रेस्क्यू वाहनासह दाखल झाले. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.