रिकॅलिब्रेशनसाठी टेबल टेस्टला दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिकॅलिब्रेशनसाठी टेबल टेस्टला 
दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी
रिकॅलिब्रेशनसाठी टेबल टेस्टला दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी

रिकॅलिब्रेशनसाठी टेबल टेस्टला दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : भाडेवाढीनंतर आता मुंबई आणि उपनगरातील रिक्षा-टॅक्सीचालकांकडून मीटर आद्ययावत करण्यात येत आहे. रिकॅलिब्रेशनसाठी एका युनियनला टेबल टेस्टची परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्याला मुंबई ग्राहक पंचायतने जोरदार विरोध केला असून तात्काळ परवानगी रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) रिक्षा-टॅक्सीच्या मीटर रिकॅलिब्रेशनसंदर्भात मुंबई रिक्षामेन्स युनियनला टेबल टेस्ट करण्याची परवानगी दिल्याचे समजते. रिक्षा-टॅक्सीचे मीटर रिकॅलिब्रेशन प्रक्रियेत अचुकता आणि विश्वासार्हता महत्त्वाची आहे. रिकॅलिब्रेशनवेळी मीटर उत्पादक, टॅक्सी/रिक्षा चालक-मालक संघटना आणि ग्राहक संघटनांनी दूर राहणे आवश्यक आहे. त्यातच मुंबई रिक्षामेन्स युनियनला रिकॅलिब्रेशनची जबाबदारी सोपवल्याने प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे, असे मुंबई ग्राहक पंचायतने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
---
रिक्षा/टॅक्सी मीटरमध्ये छेडछाड करून जादा भाडे वसूल करून ग्राहकांची फसवणूक होत असल्याची नेहमीच ओरड होते. त्यामुळे ज्यांच्याविरुद्ध तक्रार करावी लागते, त्यांच्याच संघटनेला रिकॅलिब्रेशनसाठी टेबल टेस्टिंगला परवानगी देणे हे योग्य नाही.
- शिरीष देशपांडे, कार्याध्यक्ष, मुंबई ग्राहक पंचायत