दारूसाठी पैसे न दिल्याने मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारूसाठी पैसे न दिल्याने मारहाण
दारूसाठी पैसे न दिल्याने मारहाण

दारूसाठी पैसे न दिल्याने मारहाण

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १७ (बातमीदार) ः ठाकुर्ली पूर्वेतील म्हसोबानगरात राहणारा छोटू राजभर हा दारू पिण्यासाठी संतोष मलिक यांच्याकडे १०० रुपये मागत होता. संतोषने पैसे देण्यास नकार दिल्याने छोटूने त्याला मारहाण केली. त्या दोघांचे भांडण सोडवण्यासाठी संतोष मलिकचे भाऊजी प्रशांत मध्ये पडले असता त्यांनाही छोटूने लोखंडी पट्टीने मारहाण केली. याप्रकरणी प्रशांतने दिलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलिस ठाण्यात छोटू राजभरविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.