मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्रालयात तरुणाचा 
आत्महत्येचा प्रयत्न
मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : प्रेयसीवर झालेल्या अत्याचाराबाबतच्या तक्रारीची दखल न घेतल्याने एका तरुणाने गुरुवारी (ता. १७) मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला; मात्र सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या जाळीमुळे या तरुणाचा जीव वाचला. बापू नारायण मोकाशी असे तरुणाचे असून तो बीड जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक माहितीनुसार मोकाशीच्या प्रेयसीवर अत्याचार झाल्यामुळे त्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना प्रेयसीवरील अत्याचाराबाबतच्या तक्रारीसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती, पण त्याची दखल घेतली गेली नाही. त्यानंतर शिंदे-भाजप सरकारकडेही त्याने तक्रार केली होती; पण सरकारकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्याने मंत्रालय इमारतीवरून उडी मारण्याचा प्रकार केला.