तालुका अधिकाऱ्यांची खर्डीला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तालुका अधिकाऱ्यांची खर्डीला भेट
तालुका अधिकाऱ्यांची खर्डीला भेट

तालुका अधिकाऱ्यांची खर्डीला भेट

sakal_logo
By

खर्डी, ता. १९ (बातमीदार) : खर्डी ग्रामपंचायत हद्दीत गेल्या सात दिवसांत दहा रुग्णांमध्‍ये डेंगीसदृश आजाराचे लक्षणे दिसली होती. त्यांच्यातील एकाला डेंगीची लागण झाल्याने इतर संशयित रुग्णांवर खर्डीतील खासगी व शहापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘सकाळ’मध्ये १७ नोव्हेंबर रोजी ‘खर्डीत एकाच घरात तिघांना डेंगी’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची दखल घेऊन तालुका अधिकारी डॉ. तरुलता धानके यांनी तात्काळ १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता खर्डी येथील फाऊंटन हॉटेल मागील परिसरात सर्वेक्षण करून डबक्यात जमा झालेल्या पाण्याची तात्काळ विल्हेवाट लावावी, अन्यथा मलेरियासारखे आजार पसरण्याची शक्यता यावेळी व्यक्त केली.
खर्डी ग्रामपंचायत हद्दीत डेंगी व किटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी गावातील, तसेच रुग्ण राहत असलेल्या परिसरातील पाण्याची डबकी, दलदल बुजविण्यात यावीत, तुंबलेली गटारे दुरुस्ती करणे, शोषखड्डे बुजवणे, तातडीने किटकनाशक धूरफवारणी, स्वच्छता व घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे, साथीच्‍या आजाराबाबत जनजागृती करणे याबाबत तालुका अधिकारी डॉ. तरुलता धानके यांनी खर्डीच्या ग्रामविस्तार अधिकारी अर्चना भोईर यांना लेखी सूचना केल्या आहेत.