एपीएमसी फळबाजारात भीषण आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एपीएमसी फळबाजारात भीषण आग
एपीएमसी फळबाजारात भीषण आग

एपीएमसी फळबाजारात भीषण आग

sakal_logo
By

वाशी, ता. १७ (बातमीदार) ः येथील एपीएमसी फळ बाजारात आग लागल्याची घटना आज गुरुवारी (ता. १७) दुपारच्या सुमारास घडली. बाजारातील फळांच्या पॅकिंगसाठी लागणाऱ्या लाकडी पेट्या, कागदी पुठ्ठा आणि खोके विक्री करणाऱ्या दुकानाला आग लागली. सुमारे चार गाळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
नवी मुंबई अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. संध्याकाळी उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. एपीएमसी बाजारातील एका गोडाऊनला अचानक आग लागली. या ठिकाणी असणाऱ्या कागदी लगद्याने पेट घेतल्यानंतर ही आग अधिक वाढत जात नजीकच्या लाकडी पेट्या ठेवण्यात आलेल्या दुकानांत पसरली. त्यानंतर एक एक करून इतर दुकाने आगीने आपल्या विळख्यात घेतली. तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. चार गाळे पूर्णपणे भस्मसात झाले असून इतर १८ ते २० गाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.