ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

sakal_logo
By

ठाणे, ता. १७ (वार्ताहर) ः ठाणे पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांनंतर आता एका वरिष्ठ निरीक्षकाची बदली, दोन निरीक्षकांच्या पदोन्नती करीत नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, तर एक पदोन्नती करीत सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १६ नोव्हेंबरच्या पत्रकानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल विलासराव राऊत या शांतिनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. त्यांची बदली ठाणे मुख्यालय प्रिझन एस्कॉर्ट येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक किरणकुमार दशरथ कबाडी हे शांतिनगर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांची पदोन्नती करीत त्यांना ठाण्याच्या श्रीनगर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक शंकर आनंदराव इंदलकर हे ठाणे नियंत्रण कक्षात कार्यरत होते. त्यांना पदोन्नती देत त्यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून शांतिनगर पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभाग विशेष शाखा-१ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन लक्ष्मण काब्दुले यांना पदोन्नती देत त्यांची नियुक्ती सहायक पोलिस आयुक्त वागळे विभाग येथे करण्यात आली आहे.