राहुल गांधी यांच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राहुल गांधी यांच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल
राहुल गांधी यांच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल

राहुल गांधी यांच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यभरात वाद सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीप्रमुख वंदना सुहास डोंगरे यांनी ठाणे नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रामध्ये आमच्या महापुरुषांची बदनामी सहन करणार नाही, असा पवित्रा वंदना डोंगरे यांनी घेतला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षानेदेखील यासाठी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज (ता. १८) बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ठाण्यात निषेध मोर्चा काढला. पोलिसांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी मोर्चादरम्यान केली होती. त्यानंतर संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.