आयसीएमआरमधील शास्त्रज्ञास धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयसीएमआरमधील शास्त्रज्ञास धमकी
आयसीएमआरमधील शास्त्रज्ञास धमकी

आयसीएमआरमधील शास्त्रज्ञास धमकी

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआर या शासकीय संस्थेत कार्यरत एका ३५ वर्षीय शास्त्रज्ञाला ई-मेलद्वारे दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणात गुन्हा नोंदवून भोईवाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ई-मेल पाठवणाऱ्‍याने ई-मेलसोबत दोन लोकांचा शिरच्छेद करतानाचे दोन व्हिडीओही जोडले आहेत. पवईच्या रहिवासी असलेल्या शास्त्रज्ञाकडून ५० हजार रुपयांची मागणीही करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित शास्त्रज्ञाला धमकीचा ई-मेल ११ नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला होता. पोलिसांना दिलेल्या जबानीत, शास्त्रज्ञाने सांगितले की, ई-मेलशी दोन संलग्न व्हिडीओ पाठवण्यात आले, ज्यामध्ये दोन लोकांचा धारदार शस्त्राने शिरच्छेद केला जात असल्याचे दिसत होते आणि जर मागणी पूर्ण केली नाही तर असाच शिरच्छेद करण्याची धमकी होती.