सट्टेबाजांच्या टोळक्याला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सट्टेबाजांच्या टोळक्याला अटक
सट्टेबाजांच्या टोळक्याला अटक

सट्टेबाजांच्या टोळक्याला अटक

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : टी-२० विश्वचषकाच्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यावर सट्टेबाजी केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने पाच आरोपी सट्टेबाजांना अटक केली आहे. धर्मेश ऊर्फ धीरेन रोशन शिवदसानी, गौरव रोशन शिवदसानी, धर्मेश रसिकलाल वोरा, फ्रॉन्सिस ऊर्फ विकी ॲन्थोनी डायस आणि इम्रान अर्शरफ खान अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी सट्टेबाजीतून कमावलेले पैसे दुबईतील गँगस्टरला पाठवत असल्याचा मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाला संशय आहे. पोलिसांनी छापे टाकून साहित्यही जप्त केले. आरोपी एकाच वेळी सुमारे १८ ॲप्लिकेशन्स किंवा वेबसाईटचा वापर करून क्रिकेट बेटिंग करत होते आणि या आरोपींनी गेल्या वर्षभरापासून अशाच प्रकारे वेगवेगळ्या क्रिकेटवर बेटिंग करून प्रचंड पैसा कमावला आहे, अशी माहिती तपासात समोर आली आहे.