ठाण्यातही बिल्डिींग आयडी प्रणाली राबवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यातही बिल्डिींग आयडी प्रणाली राबवा
ठाण्यातही बिल्डिींग आयडी प्रणाली राबवा

ठाण्यातही बिल्डिींग आयडी प्रणाली राबवा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : इमारतींसाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या, सेवा-सुविधांची माहिती एका क्लिकवर मिळवून देणारी माय बीएमसी बिल्डिंग आयडी प्रणाली मुंबई महापालिका लवकरच सुरू करणार आहे. त्याच धर्तीवर ठाणेकरांसाठीही ही सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मनसचे ठाणे, पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
मुंबई महापालिकेकडून इमारतीसाठी महापालिकेने दिलेल्या विविध परवानग्या, सेवांचे वेगवेगळे संदर्भ क्रमांक एकाच मुख्य क्रमांकाखाली जोडण्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे. पहिल्या टप्‍प्यात दुकाने आस्थापना, व्यापार, आरोग्य परवानगी, करनिर्धारण, जलजोडणी यांच्या ऑनलाईन प्रणाली एकत्रित होणार आहेत. टप्‍प्याटप्‍प्याने १२ विभागांची माहिती या प्रणालीमध्ये जोडली जाणार असून ही प्रणाली मोबाईल अ‍ॅपद्वारेही उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी कोणताही सल्लागार किंवा कंत्राटदार न नेमता महापालिकेच्या यंत्रणेकडून हा लोकाभिमुख प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या प्रणालीमुळे थेट महापालिका प्रशासनाकडून मिळणारी माहिती अद्ययावत व रिअल टाईम असल्याने ती उपयुक्त ठरणार आहे. तसेच घर, इमारत मालक, गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन यांना या माहितीमुळे इमारतीसंदर्भातील कामकाजात सहजता येणार आहे. व्यापार संकुल, दुकाने, सिनेमागृह, उपाहारगृह यामधील नागरी सेवा-सुविधांचा लाभ घेताना अशा इमारती दुकाने यांची सुरक्षा व कायदेशीर परवानगी या बाबतची माहिती सहजपणे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने या सर्व बाबींचा विचार करून हा उपक्रम हाती घ्यावा, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांना देण्यात आले आहे.