वेहेळेतील कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेहेळेतील कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल
वेहेळेतील कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल

वेहेळेतील कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. १९ (बातमीदार) : तालुक्यातील वेहेळे येथील माजी सरपंच दुर्जन भोईर, माजी सरपंच संतोष भोईर, प्रहार जनशक्ती पक्षाचे भिवंडी ग्रामीण विधानसभा अध्यक्ष भानुदास पाटील यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार आदी पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. या कार्यकर्त्यांमध्ये काही पूर्वाश्रमीचे भाजपचेही कार्यकर्ते आहेत.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या संघटनात्मक ताकदीत वाढ होत आहे. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पक्षांतील कार्यकर्ते भाजपचा झेंडा खांद्यावर घेत आहेत. काही दिवसांपूर्वी वाडा तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेचे मंगेश भोईर, लक्ष्मण म्हात्रे, भोलेनाथ मुकादम, रामचंद्र भोईर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.