जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर

sakal_logo
By

पालघर, ता. १९ (बातमीदार) : माहीम येथील अबोली फाऊंडेशनच्या माध्यमातून माहीम येथील परिसरातील पाच जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी वर्गासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांच्या हस्ते या शिबिराचे उद्‌घाटन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांची दात, डोळे व त्वचा यांची तपासणी करण्यात आली. टेमकी पाडा, तळपाडा, दासगाव, धावंगे पाडा व माहीम शाळा क्र. १ यामधील ९६ मुलांनी या शिबिराचा लाभ घेतला; तर ४ डिसेंबर रोजी आयोजित होणाऱ्या शिबिराच्या दुसऱ्या भागात मुलांची बालरोग तज्ज्ञांमार्फत संपूर्ण शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. दंतचिकित्सेसाठी बोईसर येथील डॉ. अतुल वर्तक, डॉ. प्रीती वतर्क, डॉ. मयुरी तांडेल, डॉ. दशर्ना शेट्टी व डॉ. समृद्धी गट्टेवार, तर त्वचा तपासणीसाठी ठाण्यातील ख्यातनाम त्वचारोग तज्ज्ञ डॉ. पल्लवी उतेकर शिबिरात सहभागी झाल्या होत्या. पालघर येथील इन्फीगो नेत्र रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी नेत्र तपासणी केली.