सीए फिट है तो हिट है उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीए फिट है तो हिट है उपक्रम
सीए फिट है तो हिट है उपक्रम

सीए फिट है तो हिट है उपक्रम

sakal_logo
By

‘सीए फिट है तो हिट है’ उपक्रम
ठाणे, ता. १९ (बातमीदार) ः इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या ठाणे शाखेच्या वतीने ‘सीए फिट है तो हिट है’ या उपक्रमाचे आयोजन ठाण्यात करण्यात आले आहे. आजचे जग हे खूप धावपळीचे आहे आणि अशातच सीए शाखेचे विद्यार्थी व सदस्यांचा दिनक्रम अत्यंत व्यग्र असतो. यामुळे त्यांच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होत असतो. तो टाळता यावा या उद्देशातून इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष स्वप्नील कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली १३ नोव्हेंबरपासून ते जानेवारीपर्यंतच्या प्रत्येक रविवारी ठाणे कॉलेज व उपवन येथे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. ‘सीए फिट है तो हिट है’ या फिटनेस कार्यक्रमांतर्गत तेज रनर्सचे फाऊंडर प्रवीण उपाध्याय, सीए सदस्य, सीए विद्यार्थी आणि कुटुंबासाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून मॅरेथॉन, कोरे ट्रेनिंग, झुंबा, योगा असे अनेक उपक्रम घेतले जात आहेत.