ठाण्यात मैदानी खेळांचा उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात मैदानी खेळांचा उत्सव
ठाण्यात मैदानी खेळांचा उत्सव

ठाण्यात मैदानी खेळांचा उत्सव

sakal_logo
By

ठाणे, ता. १९ (बातमीदार) ः आनंद भारती समाज ठाणे संस्थेतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे श्री आनंद भारती महाराज पुण्यतिथीनिमित्त चंपाषष्ठी उत्सव १३ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येत आहेत. यानिमित्ताने मैदानी क्रीडा स्पर्धा महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवांतर्गत अनेक मैदानी खेळांच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. रविवारी (ता. २०) आनंद श्री २०२२ हौशी शरीरसौष्ठव स्पर्धा होणार आहे. सोमवारी (ता. २१) जिल्हास्तरीय मुला-मुलींसाठी लंगडी स्पर्धा, मंगळवारी (ता. २२) महिला गटाच्या कबड्डी स्पर्धा; तर आंतरशालेय कुस्ती स्पर्धा बुधवारी (ता. २३) होणार आहे. तसेच २४ नोव्हेंबर रोजी मल्लखांब स्पर्धा पार पडणार आहे. २५, २६ नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धांची रंगत अनुभवता येणार आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव विवेक मोरेकर यांनी दिली.