११ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

११ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार
११ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार

११ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार

sakal_logo
By

मुरबाड, ता. २० (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील ११ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मुरबाड पंचायत समितीतर्फे मुरबाड येथील एमआयडीसी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. मुरबाड तालुक्यातील ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील भगवान घुडे, संजय घरत, नारद पडवळ, दरिया शेख, रघुनाथ रोंगटे, अंजली घायवट, अस्मिता देशमुख, शैलेश इसामे, संगीता विशे, मीनाक्षी जोगी, अश्विनी यशवंतराव या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किसन कथोरे, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, तथा शिक्षण समितीचे चेअरमन सुभाष पवार, ठाणे जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत, उल्हास बांगर, कविता कंटे, प्राजक्ता भावर्थे, किसन गिरा, मुरबाड पंचायत समितीच्या सभापती स्वरा चौधरी, सदस्य श्रीकांत धुमाळ, अनिल देसले, दीपक पवार, सीमा घरत, गटविकास अधिकारी श्वेता पालवे, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती मुरबाड संप्रदा पानसरे, विस्तार अधिकारी शिक्षण विभाग यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुणा गगे यांनी केले.
फोटो ओळी
मुरबाड ः मुरबाड येथे ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले.