गणेशपुरीत श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशपुरीत श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
गणेशपुरीत श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

गणेशपुरीत श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. २१ (बातमीदार) : देवदिवाळीनिमित्त गणेशपुरीत भगवान नित्यानंद समाधी मंदिरासमोर २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंदरम्यान अखंड हरिनाम सप्ताह तसेच दीपोत्सवाचे श्री सदानंद महाराज आश्रम संस्था, तुंगारेश्वर यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान श्री सदानंद महाराज आश्रम ते गणेशपुरीपर्यंत हरिनामाच्या जयघोषात वारकऱ्यांची पायी दिंडी सोहळा, श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन, ग्रंथ मिरवणूक, विविध मान्यवरांच्या हस्ते दीपोत्सव आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता तुंगारेश्वर आश्रम ते गणेशपुरी पायी दिंडी सोहळ्यास सुरुवात होईल. २४ नोव्हेंबरच्या दिवशी देवदिवाळीच्या शुभदिनी बालयोगी सदानंद महाराज यांच्या हस्ते गणेशपुरी येथे दीपप्रज्वलन करून पारायणास सुरुवात करण्‍यात येणार आहे. या वेळी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हभप योगेश महाराज घरत, हरिश्चंद्र महाराज, हभप रामदास भोयर महाराज (आळंदी), तसेच ज्ञानेश्वरी पारायण काळात हभप सर्वेश्वरी भिसे यांच्याद्वारे श्री नित्यानंद बाबा चरित्र रोज दुपारी २.३० ते ५ वाजेपर्यंत होणार आहे. भजन, कीर्तन, प्रवचन व श्री नित्यानंद बाबा चरित्राच्‍या माध्यमातून जनतेचे प्रबोधन करणार आहेत. २७ नोव्हेंबर रोजी संस्थेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दीपोत्सव समारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच १ डिसेंबर रोजी सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मिरवणूक झाल्यावर गणेश महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने पारायणाची सांगता होणार आहे. तरी या पारायण सोहळ्यात सहभागी होऊन भाविकांनी भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, श्री नित्यानंद बाबा चरित्र, भंडारा या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तुंगारेश्वर आश्रमातर्फे करण्यात आले आहे.