डॉ. दत्ता सामंत यांच्या स्मरणार्थ उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. दत्ता सामंत यांच्या स्मरणार्थ उपक्रम
डॉ. दत्ता सामंत यांच्या स्मरणार्थ उपक्रम

डॉ. दत्ता सामंत यांच्या स्मरणार्थ उपक्रम

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १९ (बातमीदार) ः कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची १६ जानेवारी १९९६ मध्‍ये हत्या झाली होती. त्‍या नंतर दरवर्षी याच दिवशी असोसिएशन ऑफ इंजिनियरिंग वर्कर्स युनियन आणि जिव्हाळा प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक, तसेच क्रीडा यासह अनेक उपक्रम राबवले जातात. या वर्षी मुंबईभरात तब्बल १ हजार ५२८ बाटल्या रक्त जमा करण्यात आले; तर कामगारांच्या कुटुंबांच्या कॅन्सर तपासनीसह क्रिकेट सामन्यांसह विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती कामगार आघाडीचे अध्यक्ष भूषण सामंत यांनी दिली.
मुंबईत आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात फोर्टिस रुग्णालयात १८५, एमजीएम रुग्णालयात ३१४, ग्लोबल मध्ये १६७, केईएममध्ये सर्वाधिक ३८६, तर बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात २११ आणि जेजे रुग्णालयात २६५ बाटल्या अशा तब्बल १ हजार ५२८ बाटल्या रक्त गोळा करण्यात आले. डॉ. दत्ता सामंत यांची २१ नोव्हेंबर रोजी ९० वी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर कामगार आघाडीच्या नेतृत्वाखालील असोसिएशन ऑफ इंजिनियरिंग वर्कर्स युनियन आणि जिव्हाळा प्रतिष्ठान यांच्या वतीने ओव्हल मैदानावर माझगाव डॉक आंतरविभागीय क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते; तर १७ नोव्हेंबर रोजी माझगाव डॉक येथील मुख्य प्रवेशद्वारावर महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्‍यान, २१ नोव्हेंबर रोजी मुरबाड भागातील इंदे गावात डॉ. दत्ता सामंत स्मारकात आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, २६ नोव्हेंबर रोजी एका कौटुंबिक सोहळ्यात एक स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती भूषण सामंत यांनी दिली.