ग्लोबल टीचर सुनील म्हसकर यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्लोबल टीचर सुनील म्हसकर यांचा सत्कार
ग्लोबल टीचर सुनील म्हसकर यांचा सत्कार

ग्लोबल टीचर सुनील म्हसकर यांचा सत्कार

sakal_logo
By

ठाणे, ता. २१ (बातमीदार) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ठाणे महापालिका शिक्षण विभाग गट क्रमांक १ मधील शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी आयोजित निबंध, वक्तृत्व, पथनाट्य आदी विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी सुनील म्हसकर यांनी ठाणे महापालिका शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावल्याबाबत ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या उपायुक्त अनघा कदम आणि शिक्षण विभागाच्या गट अधिकारी संगीता बामणे यांच्या हस्ते सुनील म्हसकर यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी गटप्रमुख किशोर किणी, सीआरसी समन्वयक श्वेता आंबेरकर, मुख्याध्यापिका संस्कृता पितळे, शुभांगी सीनकार, सफिक शेख आदी मान्यवर, तसेच सर्व पालिका अनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांतील बक्षीस पात्र विद्यार्थी व शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते.