शालेय कला-क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय कला-क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन
शालेय कला-क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन

शालेय कला-क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन

sakal_logo
By

शालेय कला-क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन
विरार, ता. १९ (बातमीदार) : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ए व प्रभाग समिती सी विभागातर्फे आयोजित २३ व्या शालेय कला-क्रीडा महोत्सव २०२२ स्पर्धेचे उद्‌घाटन पार पडले. विरार पश्चिम येथील वि. वा. महाविद्यालयाच्या मैदानावर आमदार क्षितिज हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले.
क्रीडा ज्योत श्री गणेश मंदिर, नारिंगी फाटा, विरार पूर्व येथून वि. वा. महाविद्यालय, जुनी इमारत मागील मैदानापर्यंत आणण्यात आली. या वेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांमार्फत उपस्थित मान्यवरांसमोर संचलन करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी या वेळी क्रीडा शपथ घेतली. मान्यवरांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून २३ व्या शालेय कला-क्रीडा महोत्सव २०२२ स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या तसेच परितोषिके मिळवणाऱ्या वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील खेळाडूंचा, प्रशिक्षकांचा या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
हा क्रीडा महोत्सव १७ ते २२ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत होणार असून महानगरपालिका क्षेत्रातील ६० शाळा, १२ महाविद्यालये यामधून सुमारे २१ हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या उदघाटन समारंभावेळी मुख्य अतिथी आमदार हितेंद्र ठाकूर, आयुक्त अनिलकुमार पवार, माजी महापौर राजीव पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काशिनाथ पाटील, सिने अभिनेत्री मृणालिनी जावळे, अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील, उपआयुक्त क्रीडा विभाग शंकर खंदारे, उपाध्यक्ष महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ग्रीष्मा पाटील, माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, माजी सभापती सखाराम महाडिक, माजी सभापती यज्ञेश्वर पाटील तसेच विविध स्पर्धक, शालेय विद्यार्थी, नागरिक, महानगरपालिकेचे कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.