शुभम वनमाळीला तेनझिंग नॉर्गे पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शुभम वनमाळीला तेनझिंग नॉर्गे पुरस्कार जाहीर
शुभम वनमाळीला तेनझिंग नॉर्गे पुरस्कार जाहीर

शुभम वनमाळीला तेनझिंग नॉर्गे पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

कासा, ता. १९ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील कासा येथील शुभम वनमाळी याला भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या क्रीडा प्रकारातील सर्वोच्च अशा तेनझिंग नॉर्गे साहसी क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार ३० नोहेंबर रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
शिवछत्रपती अवॉर्ड विजेता आंतरराष्ट्रीय ओपन वॉटर जलतरणपटू शुभमने जगप्रसिद्ध इंग्लिश खाडी, जिब्राल्टरची सामुद्रधुनी, कॅटलीना खाडी, मॅनहटन मॅरेथॉन स्विम, राऊंड ट्रीप एन्जल आयलँड स्विम, परहेन्शियन आयलँड मॅरेथॉन स्लिम, राजभवन, वाळकेश्वर ते गेटवे ऑफ इंडिया, धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया आणि गेटवे ऑफ इंडिया ते धरमतर अशा विविध राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय खाड्या पोहून विक्रम केलेले आहेत. त्याच्या या कामगिरीसाठी जलतरण स्पर्धेतील तेनझिंग नॉर्गे नॅशनल अवॉर्ड दिला जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्याला सन्मानित केले जाणार असल्याने पालघर जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे.