‘चाईल्डलाईनसे दोस्ती’ सप्ताह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘चाईल्डलाईनसे दोस्ती’ सप्ताह
‘चाईल्डलाईनसे दोस्ती’ सप्ताह

‘चाईल्डलाईनसे दोस्ती’ सप्ताह

sakal_logo
By

वडाळा, ता. १९ (बातमीदार) ः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे चाईल्ड लाईन यांच्या वतीने १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान ‘चाईल्ड लाईन से दोस्ती’ सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत गुरुवारी (ता. १७) सॅण्डहर्स्ट रोड रेल्वेस्थानक येथील स्थानक व्यवस्थापक यांचे कार्यालय सजविण्यात आले. तसेच सेल्फी पॉईंट उभारून प्रवाशांना चाईल्ड लाईनचे मित्र बनण्याचे आवाहन करण्यात आले; तर स्थानक व्यवस्थापक विनायक शेवाळे यांनी चाईल्ड लाईनच्या लोगोचे चित्र काढून शुभेच्छा दिल्या. लहान मुलांसाठी कार्य करणाऱ्या चाईल्ड लाईनच्या वतीने ‘चाईल्ड लाईन से दोस्ती’ सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत विविध रेल्वे स्थानकांत भित्तिचित्रे रेखाटून, तसेच स्थानकात सजावट करण्यात येत आहे.