साध्या सूचना पाळा; मोठे धोके टाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साध्या सूचना पाळा; मोठे धोके टाळा
साध्या सूचना पाळा; मोठे धोके टाळा

साध्या सूचना पाळा; मोठे धोके टाळा

sakal_logo
By

आपण कसे बसतो, कशी हालचाल करतो याचा आपल्‍या आरोग्‍यावर मोठा परिणाम होत असतो. याबाबत गोदरेज इंटिरिओकडून संशोधन करण्यात आले असून कामाच्‍या ठिकाणी बसण्याच्या, पाहण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरावर मोठा दुष्परिणाम होत असल्‍याचे आढळून आले आहे.

सकाळ वृत्तसेवा
पूर्वी संगणक नसताना टेबलावर मोठ्या चोपड्या ठेवून बसताना आपल्या हातांच्या विस्ताराएवढ्या हालचाली असायच्या. टाईपरायटर-संगणक आल्यावर त्यांच्या कीबोर्डबाहेर आपले हात फारसे जाईनासे झाले व खांदे आक्रसले. आता मोबाईलच्या फक्त कीबोर्डच्या जागेतच आपली बोटे चालतात व हात आखडतात. स्नायूंचे कार्यक्षेत्र कमी झाल्यामुळे हात, मान, खांदे, पाठ यांची दुखणी आपल्यामागे लागली आहेत, असे गोदरेज इंटिरिओच्या एका संशोधनात आढळून आले आहे.
काम करताना बसण्याच्या, पाहण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरावर मोठा दुष्परिणाम होत असून याकडे लक्ष दिले नाही तर ही दुखणी वाढत जाण्याची भीती आहे. यावरील उपायही सोपे असल्याने घाबरण्याचेही कारण नाही, फक्त आपल्या सवयी थोड्याशा बदलाव्यात, असे गोदरेज इंटिरिओचे उपाध्यक्ष (सेल्स व मार्केटिंग) समीर जोशी यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
ही समस्या सोडवण्यासाठी, कर्मचाऱ्यांना या त्रासाची आणि त्यावरील उपायांची जाणीव करून देणे हाच महत्त्वाचा उपाय असल्याचे संशोधनात आढळून आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना यासंदर्भात प्रशिक्षण दिल्यावर निम्म्या लोकांच्या आरोग्याची समस्या नष्ट झाली, असेही जोशी यांनी सांगितले. या संशोधनाचा फायदा सर्वच कंपन्यांना व्हावा, यासाठी गोदरेजने इतरही कंपन्यांशी सहकार्य केले असून तीस लाख वापरकर्त्यांना या टिप्स नियमितपणे दिल्या जातात. या टीपतज्ज्ञ डॉक्टर फिजिओथेरपीस्ट यांनी दिल्यामुळे त्या विश्वासार्ह आहेत.

समस्येचे गांभीर्य
* संगणक वापरणाऱ्या ५०० जणांपैकी ३८० लोकांना मान, पाठ, डोळे, गुडघे, डोकेदुखी
* ८६ टक्के लॅपटॉप वापरकर्त्यांना त्रास
* डेस्कटॉप वापरकर्त्यांना थोडा कमी त्रास
* त्रास होणारा वयोगट २६ ते ४५

समस्येची कारणे
* सतत नऊ तास लॅपटॉपसमोर बसणे
* बसण्याची, हात ठेवण्याची चुकीची पद्धत
* सतत संगणक पाहिल्याने डोळ्यांना त्रास
* त्रासाची कारणे व उपाय ठाऊकच नाहीत

उपाय
* एकाच पद्धतीने बसून काम नको
* सतत हालचाल करा
* वेगवेगळ्या उंचीच्या खुर्ची-सोफा वापरा
* थोडा वेळ उभ्याने काम करा
* अर्ध्या तासाने दोन मिनिटे चाला


गोदरेज इंटिरिओची सूत्रे
* २०-२०-२० बसल्याजागी वीस मिनिटानंतर वीस फूट लांब अंतरावरचे वीस सेकंद पाहा.
* ९०-९०-९० बसताना काटकोनातच (९० अंशात) बसा, उदा. गुडघे काटकोनात ठेवून बसा. कंबर आणि पाठ हेदेखील काटकोनात ठेवून ताठ बसा, अशी ती सूत्रे आहेत.