शाळेमध्ये तक्रार पेट्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळेमध्ये तक्रार पेट्या
शाळेमध्ये तक्रार पेट्या

शाळेमध्ये तक्रार पेट्या

sakal_logo
By

बोर्डी, ता. १९ (बातमीदार) : पोलिस आणि विद्यार्थ्यांमधील अंतर कमी करण्यासाठी पालघर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार घोलवड पोलिस ठाण्याच्या माध्यमातून शाळांमध्ये तक्रार पेट्या ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शाळांमध्ये तक्रार पेट्या बसवण्यात आल्या आहेत.
घोलवड पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तलासरी तालुक्यातील वेवजी येथील एमबीबीआय रामकृष्ण मराठी शाळेत पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर शेवाळे यांनी नुकताच तक्रार पेटी देऊन अभिनव उपक्रम सुरू केला. या तक्रार पेटीमुळे विद्यार्थ्यांना आपल्या तक्रारी मांडता येतील. तसेच तक्रारी मांडताना नावाचा उल्लेख केला नसेल तरी चालेल, तसेच याबाबत संपूर्ण गुप्तता राखली जाईल, असे यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले. आठवड्यातून एक वेळा ही तक्रार पेटी उघडण्यात येईल व विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल. तसेच गंभीर विषय असल्यास पोलिसांच्या मदतीने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मयूर शेवाळे यांनी स्पष्ट केले.

बोर्डी : तक्रार पेटीविषयी सविस्तर माहिती देताना सहाय्यक पोलिस अधिकारी मयूर शेवाळे.