सफर प्राण्यांची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सफर प्राण्यांची
सफर प्राण्यांची

सफर प्राण्यांची

sakal_logo
By

सफर प्राण्यांची

बार्किंग डियर ः भेकर

स्थळ : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय 
जन्म : राणीबागेतील जुन्या प्राण्यांपैकी एक. सर्व प्राण्यांचा जन्म येथेच झाला आहे. 
राहणीमान : एकटे किंवा कळपाने बसलेले आढळतात.
वैशिष्ट्य : धोक्याची जाणीव झाल्यानंतर भेकर भुंकल्यासारखा आवाज काढते. म्हणून त्याला ‘बार्किंग डियर’ किंवा ‘भुंकणारे हरीण’ असेही म्हणतात.
देश : बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, चीनचा दक्षिण भाग, व्हिएतनाम, जावा, बाली व कंबोडियामध्ये आढळतात.
प्रजाती : ‘बार्किंग डियर’ भारतातील जंगलात आढळणारी हरिणाची एक मुख्य प्रजाती आहे. जगात सर्वत्र भेकराच्या १२ जाती आढळून येतात.
शास्त्रीय नाव : मुंटियाकस मुंटजॅक  (Muntiacus muntjak) 
शारीरिक ठेवण : भेकर आकाराने सडपातळ आणि लहान असते. त्याची खांद्याजवळील उंची ५० ते ७५ सेमी आणि लांबी ८० ते १०० सेमी असते.
वजन ः साधारण २२ ते २३ किलो
रंग : शरीराचा रंग गडद किंवा पिवळसर तपकिरी असून पोटाकडील रंग काहीसा सफेद असतो. पायावरील केसांचा रंग किरमिजी-तांबडा असतो. भेकराचा रंग ऋतुमानानुसार बदलतो.
खाद्य : भेकर सर्वभक्षी असून त्याच्या आहारात फळे, कोवळ्या डहाळ्या व बिया आणि पक्ष्यांची अंडी, क्वचित लहान सस्तन प्राणी आणि मृत प्राण्यांचा समावेश असतो.
विणीचा हंगाम : भेकराचा विणीचा हंगाम वर्षभर असतो. मादी पहिल्या-दुसऱ्या वर्षात प्रजननक्षम होते. सहा-सात महिन्यांच्या गर्भावस्थेनंतर मादी एक किंवा दोन पिल्लांना जन्म देते. 
भेकराचा स्वभाव : भेकर दिनचर आणि निशाचर आहे. पिके तयार झाल्यानंतर रात्री फिरणे त्यांना अधिक सुरक्षित वाटते.
वैशिष्ट्य : भेकरांच्या गुणसूत्रांत आढळणाऱ्या विविधतेमुळे उत्क्रांतीच्या अभ्यासाच्या दृष्टीने त्यांना खास महत्त्व आहे.