श्रमजीवी संघटनेचे तहसीलबाहेर धरणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रमजीवी संघटनेचे तहसीलबाहेर धरणे
श्रमजीवी संघटनेचे तहसीलबाहेर धरणे

श्रमजीवी संघटनेचे तहसीलबाहेर धरणे

sakal_logo
By

विकमगड, ता. १९ (बातमीदार) : यशवंत नगर व वाकडू पाडा या गावांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी, या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले.
श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून विक्रमगड नगरपंचायतीतून वाकडू पाडा व यशवंत नगर ही दोन गावे वगळण्यात यावीत या संदर्भात अनेक आंदोलने करण्यात आली होती; परंतु गेल्या चार-पाच वर्षांपासून या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विक्रमगड तहसील कार्यालयावर श्रमजीवीने आंदोलन केले. तसेच विक्रमगड नगरपंचायत क्षेत्रामध्ये गेल्या दोन वर्षांपूर्वी रोजगार हमीतून काम करण्यात आले होते; परंतु त्या कामाची मजुरी आजतागायत मिळाली नाही. ती मजुरी त्वरित देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच विक्रमगडसाठी प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्यामुळे अनेक शेतकरी बाधित होत असून या प्रारूप विकास आराखड्याला श्रमजीवी संघटनेचा आक्षेप असून हा प्रारूप विकास आराखडा रद्द करून नवीन आराखडा तयार करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी आज श्रमजीवी संघटनेने तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती तालुका अध्यक्ष लवेश कासट यांनी दिली. या आंदोलनात विजय जाधव, तसेच तुषार सांबरे, लक्ष्मण पडवळे, मंगेश काळे, पोर्णिमा पवार, मेहुल पटेल, शंकर भोळे, गीता लोहार, अर्जुन भोरे, त्रिंबक मोरगाव, सुदाम भोळे आदी सहभागी झाले होते.