मुंबईचा अफगाणिस्तान होऊ देणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईचा अफगाणिस्तान होऊ देणार नाही
मुंबईचा अफगाणिस्तान होऊ देणार नाही

मुंबईचा अफगाणिस्तान होऊ देणार नाही

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : महाराष्ट्र आणि मुंबईतून लग्न झालेल्या पाचशे मुली गायब आहेत. मुंबईत तुष्टीकरण आणि एका विशिष्ट समाजाचे लांगुलचालन चालू आहे. हे असेच चालू राहिले तर मुंबईचा अफगाणिस्तान, काश्मिर व्हायला वेळ लागणार नाही; मात्र आम्ही हे कदापि होऊ देणार नाही, असा इशारा पर्यटनमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी दिला. भाजपतर्फे मलबार हिल येथे जागर मुंबईची सभा झाली, त्या वेळी लोढा बोलत होते. सभेला भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘जागर मुंबईचा’ हे जनतेच्या मनातील आंदोलन आहे. मुंबईची अवस्था नरकासारखी झाली आहे, रस्त्यांची अवस्था दयनीय आहे, मुंबई महापालिकेच्या शाळांची परिस्थिती भयानक आहे, पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. हे प्रश्न का सुटले नाहीत? गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत असून शिवसेनेने काय केले? त्यांनी केवळ भावनिक राजकारण करून मतदारांना फसवण्याचे काम केले. मुंबईला संपवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. याविरोधात आपल्याला संपूर्ण ताकदीने लढावे लागेल, असेही लोढा यांनी सांगितले.

ठाकरे परिवाराला आपल्या संपत्तीचे काय होणार याची काळजी आहे; तर आम्ही मालवणीतील हिंदूंच्या संरक्षणासाठी उभे आहोत. अफजलखानाच्या कबरीवर प्रतापगडावर झालेले अतिक्रमण व उदात्तीकरणाचा प्रयत्न आम्ही नष्ट केला. अफजल खानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराज बाहेर काढतानाचा पुतळा आणि लाईट व साऊंड शो आता किल्ले प्रतापगड परिसरात सरकार तातडीने सुरू करणार आहे.
- मंगलप्रभात लोढा, पर्यटनमंत्री