गोवंडीत तरुणाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवंडीत तरुणाची आत्महत्या
गोवंडीत तरुणाची आत्महत्या

गोवंडीत तरुणाची आत्महत्या

sakal_logo
By

मानखुर्द, ता. १९ (बातमीदार) ः गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी (ता. १८) पहाटे सलीम शहा या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. उसाचा रस विकणाऱ्या विक्रेत्याच्या दुकानात तो कामाला होता. त्याच दुकानात त्याने आत्महत्या केली. शिवाजीनगरमधील गीता विकास विद्यालयासमोर नफिस खान यांचा उसाचा रस विक्रीचा व्यवसाय आहे. त्या दुकानात सलीम हा कामाला होता. त्याच दुकानात तो राहत होता. गुरुवारी रात्री अकरा वाजता नफिस दुकान बंद करून घरी गेले. शुक्रवारी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे दुकानाचे शटर उघडले. तेव्हा सलीम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. याविषयी त्यांनी तत्काळ शिवाजी नगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरिय तपासणीसाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठवून दिला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन राजाने यांनी या घटनेला दुजोरा दिला, मात्र त्यावर बोलणे टाळले.