रांगोळी स्पर्धेत कल्पना नलावडे प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रांगोळी स्पर्धेत कल्पना नलावडे प्रथम
रांगोळी स्पर्धेत कल्पना नलावडे प्रथम

रांगोळी स्पर्धेत कल्पना नलावडे प्रथम

sakal_logo
By

विरार, ता. १९ (बातमीदार) : शिवसेना नवघर माणिकपूर शहराचे माजी उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांच्यातर्फे शहरात घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आणि दिवाळीमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला. या पारितोषिक रांगोळी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक कल्पना नलावडे हिला; तर गणेशोत्सव सजावट स्पर्धचे प्रथम पारितोषिक सिद्धी पाटील यांना मिळाले. वितरण सोहळ्यास शिवसेना माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम, किरण चेंदवणकर, तालुकाप्रमुख राजाराम बाबर, उपशहरप्रमुख सुधाकर रेडकर, सुभाष विश्वासराव, महिला आघाडीच्या सुलभा रेडकर आदी उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख उमेश शिखरे, प्रसाद वर्तक, सुशांत धुळप, प्रतिभा ठाकूर, विभा दुबे, शीतलसिंग, गौरव घेवडे यांनी विशेष प्रयत्न केले.