पूनम बनली कातकरी समाजातील पहिली वकील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूनम बनली कातकरी समाजातील पहिली वकील
पूनम बनली कातकरी समाजातील पहिली वकील

पूनम बनली कातकरी समाजातील पहिली वकील

sakal_logo
By

शहापूर, ता. १९ (बातमीदार) : शहापूरजवळील वाफे येथील कातकरी समाजातील पूनम हिलम ही वकील झाली असून तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. शहापूर तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.
कातकरी समाजातील बरीच मुले ही शिक्षणापासून दूरच राहत असतात. सालगडी तसेच वेठबिगारी म्हणूनच या समाजातील लोकांचे जगणे असते. आदिवासी समाजामध्ये कातकरी लोक सर्वांत मागास म्हणून ओळखले जातात. त्यामुळे जिद्दीने शिक्षण घेऊन वकील झालेल्या पूनमचे कौतुक आहे.
शहापूर तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने पूनमच्या घरी भेट घेऊन तिचे व तिच्या पालकांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख कुलदीप धानके, तालुका सचिव रवी लकडे, विजय शिंदे, स्वानंद शेलवले, अतीश अधिकारी, योगेश लुटे, प्रकाश म्हसकर हे उपस्थित होते. या वेळी भाजप राघोजी भांगरे प्रतिष्ठान शहापूर यांच्या वतीने पूनम हिचा सत्कार करण्यात आला. या वेळी अशोक इरनाक, विठ्ठल भांगरे, अनत कोर्डे आदी उपस्थित होते.