२७ तासांत ९०० तासांचे काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२७ तासांत ९०० तासांचे काम
२७ तासांत ९०० तासांचे काम

२७ तासांत ९०० तासांचे काम

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ ः कर्नाक उड्डाणपुलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेने २७ तासांचा जम्बोब्लॉक घेतला आहे. या कालावधीत मध्य रेल्वेवर रखडलेली विविध कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. ही कामे जवळपास ९०० तासांइतकी असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

मध्य रेल्वेवरील कर्नाक पूल धोकादायक झाल्याने २२ ऑगस्ट २०२२ पासून तो बंद करण्यात आला होता. या उड्डाणपुलाचे तोडकाम सुरू करण्यात आले असून मध्य रेल्वे पुलावरील गर्डर काढण्यासाठी २७ तासांचा मेगाब्लॉक घेणार आहे. हा नियोजित मेगाब्लॉक शनिवारी (ता. १९) रात्री ११ पासून ते सोमवारी (ता. २१) मध्यरात्री २ वाजेपर्यंत असणार आहे. २७ तासांच्या ब्लॉकच्या मदतीने मध्य रेल्वे शॅडोब्लॉक घेणार आहे. त्यामुळे रेल्वेला भविष्यातील ब्लॉक कालावधीत सुमारे ९०० तासांची बचत होणार आहे. यामध्ये अभियांत्रिकीचे ५०५ तास, ओव्हरहेड इक्विपमेंटचे २३५ तास आणि सिग्नल ॲण्ड टेलिकॉमच्या १६० तासांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर सुमारे २००० कामगार शॅडो ब्लॉकमध्ये या विभागाची देखभाल करतील. यासाठी सहा टॉवर वॅगन आणि अभियांत्रिकी यंत्रसामग्रीची १० वाहने वापरली जातील.
---
कोणती कामे होणार?
ट्रॅक नूतनीकरण (२.४ किमी)
मॅन्युअल डीप स्क्रीनिंग (१ किमी)
३०० स्लीपर बदलणे
प्लेन ट्रॅक टँपिंग
टर्नआऊट टँपिंग
स्वीच रिप्लेसमेंट
टर्नआऊटस् आणि ट्रॅकचे मॅन्युअल लिफ्टिंग
सिग्नल-लोकेशन बॉक्स
ट्रॅक वायर, जंपर्स बदलणे
पॉइंट मशीन रॉडिंग आणि केबल मेगरिंग
५००० घनमीटर गाळ काढणे
---
प्रवाशांची मदतीसाठी हेल्पडेस्क
ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, दादर, ठाणे, वडाळा रोड आणि पनवेल स्थानकांवर हेल्पडेस्क सुरू केली आहेत. हे हेल्पडेस्क तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडून आरपीएफच्या साह्याने चालवले जाणार आहेत.
---
अतिरिक्त एटीव्हीएम सुविधा
जम्बोब्लॉकच्या कालावधीत अतिरिक्त आरक्षण रद्दीकरण काऊंटर महत्त्वाच्या स्थानकांवर उघडले जाणार आहेत. यामध्ये सीएसएमटी, दादर, भायखळा, पनवेल, नाशिक, पुणे स्थानकांचा समावेश आहे; तर प्रवाशांच्या सुविधेसाठी अतिरिक्त एटीव्हीएम सुविधा उपलब्ध केल्या जातील.
---
शॅडो ब्लॉक म्हणजे काय?
शॅडो ब्लॉकचे काम नो ट्रेन झोनमध्ये म्हणजे मुख्य मार्गावरील सीएसएमटी आणि भायखळादरम्यान तसेच हार्बर मार्गावरील सीएसएमटी आणि वडाळा रोडदरम्यान केले जाणार आहे. सीएसएमटी-भायखळा विभागात आणि सीएसएमटी-वडाळा रोड विभागातील मार्गांवर हे काम केले जाणार आहे.