पत्नीसोबतच्या वादानंतर चिमुकल्याची पित्याकडून हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीसोबतच्या वादानंतर चिमुकल्याची पित्याकडून हत्या
पत्नीसोबतच्या वादानंतर चिमुकल्याची पित्याकडून हत्या

पत्नीसोबतच्या वादानंतर चिमुकल्याची पित्याकडून हत्या

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : पत्नीशी झालेल्या वादानंतर पित्याने आपल्या सहै वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. १९) सकाळी मालाड पश्चिमेतील मालवणीमध्ये घडली. लक्ष अधिकारी असे या चिमुकल्याचे नाव आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तसेच गुन्हा दाखल करून पिता नंदन अधिकारी (४४) याला अटक केली आहे.

नंदन हा पत्नी आणि दोन मुलांसह मालवणी परिसरात राहतो. त्याच परिसरात अंडीविक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी सकाळी नंदनची पत्नी सुनीता १३ वर्षांच्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेली. ती घरी परतली तेव्हा तिला घराच्या फरशीवर लक्षचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. तिने मदतीसाठी आरडाओरड केल्यावर शेजाऱ्यांनी तिच्या घराकडे धाव घेतली आणि नंतर मालवणी पोलिसांना माहिती दिली. दोघा पती-पत्नीमध्ये अनेकदा किरकोळ वाद होत होते. त्यांच्यात अनेकदा खटके उडत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. या वादातूनच त्याने मुलाची हत्या केल्याचा संशय आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.