राजा शिवाजी विद्यालयात बच्चे कंपनीचा जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजा शिवाजी विद्यालयात बच्चे कंपनीचा जल्लोष
राजा शिवाजी विद्यालयात बच्चे कंपनीचा जल्लोष

राजा शिवाजी विद्यालयात बच्चे कंपनीचा जल्लोष

sakal_logo
By

वसई, ता. २० (बातमीदार) : बालदिनाचे औचित्य साधून नालासोपारा पूर्वेकडील छत्रपती शिक्षण संस्थेच्या राजा शिवाजी विद्यालयात लहान मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बच्चे कंपनीने जल्लोष केला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला चाचा नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका आशा रॉड्रिग्ज यांच्या हस्ते करण्यात आले; तर म्युझिकल ग्रुप ऊर्जा फाऊंडेशनच्या कलाकारांनी यावेळी देशभक्तीपर व मैत्रीवर आधारित गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच पूर्व माध्यमिक विभागातर्फे नूतन जामसांडेकर यांनी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले. यावेळी लहान मुलांनी विविध पोशाख परिधान केले होते, तर बाल जादूगार स्वरांग दिवेकर यांनी जादूचे प्रयोग दाखवले. छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण हाटे, मुख्याध्यापिका माया मोहिते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी खाऊवाटप करून बालदिनाची सांगता करण्यात आली.
------------------------
वसई : राजा शिवाजी विद्यालय येथे लहान मुलांनी जल्लोष केला.