बेशिस्त रिक्षाचालकांना आरटीओचा दणका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेशिस्त रिक्षाचालकांना आरटीओचा दणका
बेशिस्त रिक्षाचालकांना आरटीओचा दणका

बेशिस्त रिक्षाचालकांना आरटीओचा दणका

sakal_logo
By

कल्याण, ता. २० (बातमीदार) : कल्याण आरटीओ अंतर्गत येणाऱ्या शहरात रिक्षाची संख्या ५५ हजार ७५ झाली असून, केवळ कल्याण-डोंबिवली शहरात ३० हजारांहून अधिक रिक्षा आहेत. विनम्र सेवा देण्यापेक्षा प्रवासी वर्गाची पिळवणूक करणारे रिक्षाचालक अशी कल्याण-डोंबिवली शहराची ओळख होत असून रिक्षाचालक बेशिस्त असल्याचे आरटीओच्या आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे उघड झाले आहे.
---------------------
वाहनांची संख्‍या उदंड
कल्याण आरटीओ अंतर्गत कल्याणसह डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, टिटवाळा आदी शहराचा समावेश होत असून या शहरात विविध प्रकारच्या वाहनांची संख्या आजमितीला १२ लाख ५६ हजार ९७७ झाली आहे.
--------------------------
नियमांचे उल्‍लंघन
सरकारने दिलेल्या नियमांचे पालन न करणे, गणवेश नसणे, अल्पवयीन रिक्षाचालक, कागदपत्रे नसणे असे प्रकार आरटीओच्या विविध कारवाईमध्ये उघड झाले आहेत.
---------------------------
तक्रारींच्‍या प्रमाणात वाढ
मुळात रिक्षा प्रवास हा मीटरप्रमाणे व्‍हायला हवा. मात्र, रिक्षाचालक आणि त्यांचे नेते, संघटना, नियम धाब्यावर बसवून शहरात व्यवसाय करत आहेत. तक्रारींचे प्रमाण वाढल्‍यानंतर आरटीओमार्फत कारवाई करण्‍यात येत असून आगामी काळात बेशिस्त रिक्षाचालकांना आळा बसेल का, असा सवाल केला जात आहे.
---------------------------
रिक्षाचालकांची मनमानी...
कल्याण-डोंबिवलीमध्ये सरासरी रिक्षाची संख्या ३० हजारहून अधिक असून जागोजागी रिक्षा प्रवाशांना सेवा देण्यापेक्षा अडवणूक करताना दिसतात. सरकारी सार्वजनिक वाहतूक सेवा अपयशी ठरल्याने रिक्षाची संख्या वाढली आहे. एकही रिक्षा मीटरने धावत नसून शेअर पद्धतीने भाडे घेत आहेत.
----------------------------------
नोव्‍हेंबर महिन‍यांतील कारवाई
७३० रिक्षांची तपासणी
१८७ रिक्षा दोषी
८ लाख ६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल
------------------------------
कोट
कल्याण-डोंबिवली शहरात बेशिस्त आणि दोषी रिक्षाचालक आढळून आले असून रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करत प्रवासी वर्गाची पिळवणूक थांबवावी, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल.
- विनोद साळवी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण