पर्यावरण संरक्षण प्राधिकरण अध्यक्षांची उद्योजकांसोबत चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरण संरक्षण प्राधिकरण अध्यक्षांची उद्योजकांसोबत चर्चा
पर्यावरण संरक्षण प्राधिकरण अध्यक्षांची उद्योजकांसोबत चर्चा

पर्यावरण संरक्षण प्राधिकरण अध्यक्षांची उद्योजकांसोबत चर्चा

sakal_logo
By

बोर्डी, ता. २० (बातमीदार) : डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण समितीचे अध्यक्ष आणि निवृत्त न्यायाधीश अरुण चौधरी यांनी उद्योजक रवींद्र पाठक यांच्या नेतृत्वाखाली डहाणू येथील उद्योजकांनी भेट घेऊन उद्योगबंदीबाबत सविस्तर चर्चा केली. सर्वोच्च न्यायालयाच्या २० जून १९९१ अध्यादेशानुसार डहाणू तालुक्यातील उद्योग-धंदे अडचणीत आले आहेत. याबाबत पुनर्विचार करण्यात यावा, अशी विनंती यावेळी उद्योजकांनी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या या अध्यादेशामुळे तालुक्यातील उद्योग-धंदे बंद पडल्यामुळे बेरोजगारी निर्माण होऊन कामगारांना गुजरात राज्यात रोजगारासाठी जावे लागते, असेही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. डहाणू तालुक्यात पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही, अशा प्रकारचे उद्योग व्हायला पाहिजे, या विषयावर चर्चेत भर देत चौधरी यांनी उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच पुढील महिन्यात डहाणू येथे पर्यावरण प्राधिकरणाच्या सदस्यांसह दौरा आयोजित करून तालुक्यातील उद्योजकांच्या अडचणी समजून घेऊ, तसेच येत्या काळात उद्योगाबाबत काय करता येईल, याविषयी विचारविनिमय करून प्रगती करण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रकरण जास्त काळ प्रलंबित राहणार नाही, असे सकारात्मक आश्वासन अरुण चौधरी यांनी दिले.