राहुल गांधींच्या विरोधात भाजपची निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राहुल गांधींच्या विरोधात भाजपची निदर्शने
राहुल गांधींच्या विरोधात भाजपची निदर्शने

राहुल गांधींच्या विरोधात भाजपची निदर्शने

sakal_logo
By

कांदिवली, ता. २० (बातमीदार) ः कांदिवली रेल्वेस्‍थानकाजवळ भाजपच्‍या चारकोप विधानसभा अध्यक्ष व माजी नगरसेवक बाळा तावडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. १८) राहुल गांधींच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. या वेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाजप जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, माजी नगरसेवक बाळा तावडे, माजी नगरसेविका लीना देहेरकर, माजी नगरसेविका प्रतिभा गिरकर, महामंत्री योगेश पडवळ आदींनी या वेळी राहुल गांधींच्या विरोधात भाषणे केली; तर जमलेल्या भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी राहुल गांधी यांच्‍या विरोधात घोषणा दिल्या. दरम्‍यान, या आंदोलनावेळी राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्यास कार्यकर्त्यांनी यांनी ‘जोडे मारो’ आंदोलन केले.