काव्यवाचन स्पर्धेचा समारोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काव्यवाचन स्पर्धेचा समारोप
काव्यवाचन स्पर्धेचा समारोप

काव्यवाचन स्पर्धेचा समारोप

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २० (बातमीदार) ः हिंदी विद्या प्रचार समिती, घाटकोपरचे माजी अध्यक्ष स्मृती शेष पृथ्वीराज सिंह यांच्या स्मरणार्थ हिंदी हायस्कूल येथे गुरुवारी (ता. १७) आंतरशालेय कवितावाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुंबई आणि ठाण्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विद्या प्रचार समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह होते; तर हिंदी हायस्कूलचे माजी प्राचार्य राजदेव सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्ञानोदय विद्या मंदिर, ठाणे येथील सतीश पाठक या विद्यार्थ्याला प्रथम, घाटकोपर येथील हिंदी हायस्कूलच्या सुहानी सिंग द्वितीय; तर मालाड येथील केजीएस सर्वोदय विद्यालयाची विद्यार्थिनी पीना सिंग हिला तृतीय पारितोषिक मिळाले. सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल आयडीयूबीएस हायस्कूल भांडुपला फिरती ढाल प्रदान करण्यात आले. ज्युरीमध्ये आर. जे. महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्राध्यापक डॉ. चंद्र प्रकाश सिंग, समाजसेवक शिक्षणतज्ज्ञ चंद्रवीर बंशीधर यादव, प्रसिद्ध गझलकार संतोषकुमार सिंग यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या शेवटी संतोष कुमार सिंग यांनी आपल्या गझल सादरीकरणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. शाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्रकुमार सिंग यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, उपमुख्याध्यापक राजेंद्र सिंह यांनी आभार मानले; तर पर्यवेक्षक अभय प्रताप सिंग यांनी सूत्रसंचालन केले.