पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांची आढावा बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांची आढावा बैठक
पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांची आढावा बैठक

पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांची आढावा बैठक

sakal_logo
By

पालघर, ता. २० (बातमीदार) : जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्व विभागांना भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या उपस्थितीत सर्व खातेप्रमुखांचा आढावा घेतला.
सोमवारपासून (ता. २१) सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गळ्यात ओळखपत्र घातलेले असावे. तसेच येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांची आस्थेने विचारपूस करणे, त्यांना सकारात्मक वागणूक देणे अशा सूचना निकम यांनी दिल्या. त्याबरोबरच ज्यांचे प्रलंबित प्रश्न, पेन्शन प्रकरणे, इत्यादी बाबींचा लवकरात लवकर निपटारा करण्याचा प्रयत्न करावा, असेदेखील सूचित केले.
येत्या दोन दिवसांत इमारतीमधील उपाहारगृह तात्पुरत्या स्वरूपात तरी सुरू करावे, अशी सूचना अध्यक्षांनी केली. जिल्हा परिषदेचा सेस वाढवण्यावर भर देण्यात येऊन त्यासाठीच्या ठोस उपाययोजना करण्यात याव्यात. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या इमारती ज्या सध्या वापरात नाहीत, अशा इमारती भाडेस्वरूपात देऊन त्यांचा सेस वाढवण्यासाठी उपयोगात येऊ शकतात, असे अध्यक्ष निकम यांनी सुचविले.
नळपाणी पुरवठा योजना, बोअरवेल किती पूर्ण झालेत, याबाबतदेखील सविस्तर आढावा घेण्यात आला. शिक्षण विभागाकडून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यावेत, जिल्हा परिषद संकुलात मोठ्या झाडांची लागवड झाली पाहिजे. जेणेकरून परिसर सुंदर होईल व सावली मिळेल, या हेतूने झाडांची लागवड करण्याच्या सूचना संबंधित खातेप्रमुखांना दिल्या. या वेळी सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.