मुलुंडमध्ये बुधवारपासुन कोकण महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये बुधवारपासुन कोकण महोत्सव
मुलुंडमध्ये बुधवारपासुन कोकण महोत्सव

मुलुंडमध्ये बुधवारपासुन कोकण महोत्सव

sakal_logo
By

मुलुंड, ता. २० (बातमीदार) ः मुलुंड सेवा संघ, महिला बचत गट आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोकण महोत्सव-२०२२’ चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, २३ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीदरम्यान मुलुंड पूर्वेतील मुलुंड तालुका क्रीडा संकुल, वामनराव मुरांजण माध्यमिक विद्यालयाशेजारी हा महोत्‍सव पार पडेल. याचे उद्‌घाटन ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक करणार असून प्रमुख अतिथी म्हणून आमदार मिहिर कोटेचा यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
दरम्‍यान, बुधवारी (ता. २३) नाद ब्रह्मा प्रस्तुत ‘अमृतवाणी’ हा मराठी-हिंदी गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच १२ दिवस होणाऱ्या या महोत्सवामध्ये दशावतार, गीते, धम्माल नृत्य, होम मीनिस्टर हा पैठणीचा खेळ, जादूचे प्रयोग, नवदुर्गा मंगळागौर, डबलबारी भजन, लोकगीते, कोळी गीते आदी कार्यक्रमांचा समावेश असेल. महोत्सवाला प्रवेश विनामूल्य असून सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मुलुंड सेवा संघातर्फे कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी हा महोत्सव मोठ्या प्रमाणावर करणार आहोत. कोकणची संस्कृती जोपासण्यासाठी आणि कोकणी माणसाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हा महोत्सव साजरा करणार आहोत. या महोत्सवाला सुमारे १ ते १.५ लाख नागरिक भेट देणार आहेत.
- प्रकाश गंगाधरे, माजी नगरसेवक, अध्यक्ष, मुलुंड सेवा संघ