वसई ते हायवे मुख्य रस्त्यावर लागणार पथदिवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई ते हायवे मुख्य रस्त्यावर लागणार पथदिवे
वसई ते हायवे मुख्य रस्त्यावर लागणार पथदिवे

वसई ते हायवे मुख्य रस्त्यावर लागणार पथदिवे

sakal_logo
By

विरार, ता. २० (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रेंज ऑफिस ते सातविली, तसेच रेंज ऑफिस ते वसई फाटा या रस्त्यावर पथदिवे बसवण्यात येणार आहेत.
मागील तेरा वर्षांपासून पथदिवे नसल्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या मुख्य रस्त्यावर पथदिवे बसविण्यात यावेत, अशी मागणी करत युवासेनेचे अतुल काकासाहेब मोटे यांनी आंदोलनाचा इशारा महापालिका प्रशासनाला दिला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून आता या मुख्य रस्त्यांवर पथदिवे लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या वर्षाखेरीस या रस्त्यावर पथदिवे बसविण्याचे काम पूर्ण होणार असल्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे.
रेंज ऑफिस ते सातविली, तसेच रेंज ऑफिस ते वसई फाटा हा रस्ता मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा असल्याने या रस्त्यावर दैनंदिन हजारो वाहनांची वर्दळ असते. त्यासोबतच या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असल्याने कामगार वर्गाचीदेखील मोठ्या प्रमाणात ये-जा असते; मात्र या रस्त्यावर कुठेही पथदिवे नसल्याने दैनंदिन लाखो वाहनचालकांना आणि नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत युवासेनेचे अतुल काकासाहेब मोटे यांच्या माध्यमातून मागील कित्येक महिन्यांपासून वसई-विरार महापालिकेकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला आता यश आले असून महापालिकेने हे रस्ते प्रकाशमय करण्याचे काम हाती घेतले आहे.